मी अनुभवलेली छान दिवाळी.😊 🎊🎊अक्षर दिवाळी 2022🎊🎊 दिवाळी आली ती दर वर्षी येते तशी.मधे Covid मुळे दिवाळी चा पाहिजे तसा आनंद घेता आला नाही. फराळ, पाहुणे,गप्पा, फटाके गावी जाणे.आता खूप मज्जा करू. सर्व खुश होते. पण ह्याही पेक्षा 2022 मध्ये एक छान गोष्ट होणार होती,त्याकडे आमचे लक्ष लागले होते. 29 आणि 30 ऑक्टोबर ला पुसद येथे होणारे जनमंगल चे साहित्य संमेलन. तसे बघितले तर painting, लेखन, वाचन, कविता करणे, अभिवाचन करणे हे आवडीचेच.पण काही मैत्रिणींमुळे मी जनमंगल समूहाकडे ओढल्या गेलीच. आणि पुसद येथील साहित्य संमेलनाला जाण्याचा जबरदस्त योग आला. जनमंगल साहित्य संमेलन आणि लोकव्रत प्रकाशन सोहळा. सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद. सोबतीने लिहुया..म्हणत,नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणे हीच गोष्ट महत्त्वाची. सर्व चमूने घेतलेली मेहनत,विशेषतः लहान मुलांना पाठिंबा देणे, 12,13 वर्षाच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना मार्गदर्शन करणे ही जमेची बाजू. ह्या संमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे चित्रकला प्रदर्शन.बाल कलाकारां च्या भावना त्यांच्या चित्रातून व्यक्त होत होत्या. मोगरे ताई,वैष्णवी, श्रेया आणि चमू ने घेतलेली मेहनत दिसत होती. पुसद मधील ते प्रेमळ स्वागत, ग्रंथ दिंडीत मुलांचा सहभाग,मैत्रिणींचा जल्लोष, सर्वत्र प्रसन्न करणारा लेझीम,टाळ चा मंजुळ नाद…. खूप छान वाटले. तशी 51 पुस्तकांचे प्रकाशन आणि मुलांची चित्रकलेची 2 पुस्तके प्रकाशित झाली. चित्रकोष आणि ड्रीमआर्ट. आदरणीय सौ. वर्षाताई,शिरीष कुलकर्णी सर अर्थात ह्यांचे मार्गदर्शन फार महत्त्वाचे. धन्यवाद श्रेया मला ह्या संमेलनाला आमंत्रित केलेस,सन्मानित केलेस, माझ्या हस्ते इतक्या सुंदर चित्रकला प्रदर्शनी चे उद्घाटक म्हणुन बोलावलेस… माझ्या कवितेचे, गझल गायनाचे कौतुक केलेस, इतक्या भव्यदिव्य कार्यक्रमात सहभागी करुन घेतलेस. खूप खूप धन्यवाद श्रेया (श्रेया सरनाईक)आणि जनमंगल समूह.आणि खूप खूप शुभेच्छा सर्व नवोदितांना पुढील प्रवासासाठी.